Meditation and Thoughts

Meditation and Thoughts

Meditation is not something that can be learned in a day.

Nowadays, everyone who wakes up advises them to meditate. We try to keep the mind calm, but where does it stay in one place? When we try to meditate with our eyes closed, countless topics come to mind. Instead of calming the mind, it becomes more restless.

Everyone who meditates has this initial experience. Because, meditation is not something that can be learned in a day. For that, it has to be practiced with effort. Let’s learn how to do it.

Calming the mind is the most difficult thing. Similarly, in today’s multi-tasking era, our mind is so busy with work and things that to free it from there and immerse it in meditation is a real challenge! However, anything can be achieved with practice and positivity. Efforts are worth it….

Choose morning time to meditate…

Choose morning time for meditation, after waking up, observe yourself with a calm mind, without looking at your mobile, with your eyes closed. In the morning, there is no traffic of thoughts in your head. Therefore, the path is clear for the mind to concentrate. Even if thoughts come, let them come. After some time, they too will go away. Slowly, like the calm flow of a river, the waves in the mind will stop and the mind will be ready for meditation.

Don’t play music during meditation…

Basically, meditation is done to detach the mind from everything. When meditating while listening to any kind of music, the mind will get absorbed in listening to the song and thoughts related to the song will start entering the mind. At such a time, remember that you want to listen to the music of the breath without listening to any music.

Meditation and Thoughts

मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही…

आजकाल जो उठतो, तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मन शांत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करून पाहतोही, पण ते कुठे एका जागी थांबते? डोळे बंद करून ध्यानधारणेचा प्रयत्न केला असता, असंख्य विषय मनात थैमान घालत असतात. अशाने मन शांत होण्याऐवजी जास्तच अशांत होतं.

मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया.

मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. प्रयत्ने कण रगडीता….

मेडिटेशन करण्यासाठी सकाळची वेळ निवडा…

मेडिटेशन करण्यासाठी सकाळची वेळ निवडा, उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.

ध्यानधारनेच्या वेळी संगीत लावू नका…

मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकत ध्यानधारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमेल आणि गाण्याशी संबंधित विचार मनात डोकावू लागतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा.

Leave a Comment