BARTI Dr. Babasaheb Ambedkar Development and Training Institute, Pune

BARTI Dr. Babasaheb Ambedkar Development and Training Institute, Pune

Important notice महत्त्वाची सूचना BARTI :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य BARTI

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था)
मुख्यालय २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१
दूरध्वनी क्र. ०२०-२६३४३६०० / २६३३३३२०/२६३३३३३९
Website: www.barti.in E-mail: dg@barti.in
जा. क्र. /बार्टी/योजना/२०२४-२५/५२७४
दि. १५/१०/२०२४
महत्त्वाची सूचना

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत सामायिक प्रवेश परीक्षांमधून संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा,
अराजपत्रित गट “ब” व “क, पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण, बँक (IBPS), रेल्वे, एल. आय. सी व
इतर तत्सम स्पर्धा प्रतिक्षा पूर्व प्रशिक्षण संदर्भातील पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता निवड झालेल्या
उमेदवारांसाठी संस्था निवडीबाबतची विकल्प लिंक उपलब्ध करून देणेबाबत…

सर्वकष धोरणांतर्गत महाराष्ट्र राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती आणि टीआरटीआय या संस्थांच्या
लाभार्थी गटांकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२४- २५ संबंधित विविध
योजनांच्या लाभार्थी निवडी करिता घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मार्फत राबविल्या जाणा-या खाली नमूद केलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व
प्रशिक्षण योजनांसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या निवड यादीतील उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण
देणाऱ्या खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या BARTI संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१. संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना

२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना
३.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना
४. महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना
५. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट “ब” व “क” स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना
६. बँक (IBPS), रेल्वे,एल. आय. सी व इतर तत्सम स्पर्धा प्रतिक्षा पूर्व प्रशिक्षण
७. पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

  • सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याकरिता ऑनलाइन विकल्प
    देण्याची लिंक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर दि.१५/१०/२०२४ ते दि.
    २०/१०/२०२४ रात्री ११:५९ वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील. सदर स्पर्धा परीक्षा पूर्व
    प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याकरिता ऑनलाइन विकल्प देण्याची लिंक उपरोक्त नमूद
    कालावधी पर्यंतच चालू राहील व त्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याबाबतची सर्व
    उमेदवारांनी नोंद घ्यावी.
    जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा योजनांसाठी ( UPSC, MPSC (State
    Service, MES, JMFC, Group B and C ) and other )
    BARTI पात्र ठरला असेल तर त्याने/तिने
    आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करणे आवश्यक आहे.

  • तसेच UPSC पूर्व प्रशिक्षण योजनेबाबत दिल्ली प्रशिक्षण- ३००, येरवडा संकुल- ७०, राज्य प्रशासकीय
    व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र (PITC) छ. संभाजीनगर,
    नागपूर, कोल्हापूर, अमरावती व नाशिक प्रत्येक ठिकाणी १० प्रशिक्षणार्थी यानुसार ६० तसेच यशदा – ३०
    यापैकी योजनेची निवड करता येणे शक्य आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमाबाबत (इंग्रजी /मराठी) उमेदवारांनी संबंधित
    पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित खाजगी संस्थेशी संपर्क करून त्याबाबत खात्री करून घेऊनच विकल्प भरावे.
    योजनेशी संबंधित नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांची माहिती View Details Tab मध्ये उपलब्ध असून त्याचा वापर
    संपर्काकरिता करावा.
    ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मानण्यात येऊन त्या योजनेशी संबंधित
    नामनिर्देशित खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल. जितक्या संस्था नमूद
    आहेत त्या सर्वांना उमेदवारांनी पसंतीक्रम/विकल्प (Preference) द्यायचा आहे. सर्व संस्थांना पसंतीक्रम/विकल्प
    दिल्यानंतर OTP द्वारे सदर पसंतीक्रम/विकल्प अंतिम केल्यानंतरच आपले पसंतीक्रम/विकल्प Submit
    करण्याचा Tab कार्यान्वित होईल. Submit वर click केले असता आपले पसंतीक्रम/विकल्प नोंद होऊन त्याची
    Acknowledgement Receipt (पोच पावती) तयार होईल.
    सदर प्रमाणे प्राप्त झालेले पसंतीक्रम/विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करता येणार नाही,
    सबब उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी योजनेची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी तसेच प्रशिक्षण
    संस्थांचे विकल्प हे त्यांच्या संदर्भातील उपलब्ध माहिती View Details Tab मधून वाचून त्यानंतरच भरावे
    प्रत्येक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत देय असलेले प्रशिक्षण शुल्क व प्रशिक्षणार्थीना
    देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाबाबतची सविस्तर माहिती ( Stipend and any other payments as
    applicable) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
    उमेदवारांनी सर्व माहिती पडताळून त्यानंतरच आपली योजना व प्रशिक्षण संस्था विकल्प देण्याची कार्यवाही पूर्ण
    करावी.
    पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या निवडीकरिता ऑनलाइन विकल्प देण्यासाठी संबंधित लिंक वरून लॉगीन करणे
    आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी प्रवेश अर्ज (Application Form ) भरताना वापरलेल्या Email ID व
    Password यांचा वापर करावा. सदर Password आपल्या प्रवेश पत्रावरही नमूद आहे. तसेच आपले लॉगीन
    आयडी व पासवर्ड हे संबंधित उमेदवारांना त्यांनी प्रवेश अर्ज (Application Form) भरताना वापरलेल्या Email
    ID वर पुनःश्च पाठविण्यात येतील. सबब उमेदवारांनी सदर इमेल व मोबाईल क्रमांक चालू स्थितीत ठेवणे
    आवश्यक आहे.
    ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मानण्यात येऊन त्या योजनेशी संबंधित
    नामनिर्देशित खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल. जितक्या संस्था नमूद
    आहेत त्या सर्वांना उमेदवारांनी पसंतीक्रम/विकल्प (Preference) द्यायचा आहे. सर्व संस्थांना पसंतीक्रम/विकल्प
    दिल्यानंतर OTP द्वारे सदर पसंतीक्रम/विकल्प सत्यापित ( verify ) केल्यानंतरच आपले पसंतीक्रम/विकल्प
    Submit करण्याचा Tab कार्यान्वित होईल. Submit वर click केले असता आपले पसंतीक्रम/विकल्प नोंद होऊन
  • त्याची Acknowledgement Receipt (पोच पावती) तयार होईल. OTP द्वारे जोपर्यंत आपण विकल्प
    सत्यापित (verify) करत नाही तोपर्यंत आपले विकल्प अंतिम होणार नाहीत.
    सदर प्रमाणे प्राप्त झालेले पसंतीक्रम/विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करता येणार
    नाही, सबब उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी योजनेची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी तसेच
    प्रशिक्षण संस्थांचे विकल्प हे त्यांच्या संदर्भातील उपलब्ध माहिती View Details Tab मधून वाचून त्यानंतरच
    भरावे.
    सदर विकल्प लिंक वर Contact Us या Tab / शीर्षकाखाली सर्व संबधित योजनांचे योजनानिहाय संपर्क
    Email ID दिले आहेत. तसेच विकल्प लिंक वर लॉगीन केल्यानंतर Support या Tab / शीर्षकाखाली
    Raise A Ticket या सुविधेद्वारे आपली समस्या नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली
    आहे. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी केवळ याच मार्गाने आपल्या समस्या नोंदवाव्या. इतर
    कोणत्याही Email तसेच संपर्क क्रमांकावर आपल्या तक्रारी अथवा समस्येची नोंद घेतली जाणार नाही याची नोंद
    घ्यावी.
    संबंधित खाजगी नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांमधील BARTI उपलब्ध प्रशिक्षणार्थी संख्येनुसार उमेदवारांना
    प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.

स्वाक्षरी..
(सुनिल वारे)
महासंचालक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन
व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) BARTI पुणे

Leave a Comment