What happens during a heart attack?
During a heart attack, there are significant changes in the levels of some of the blood components that keep the heart working properly.
A tanker carrying oil contains thousands of liters of petrol or diesel, but the engine of that tanker has no use for it. Only if the tanker’s own oil is properly supplied to it through the pipes connected to the engine, the engine continues to run smoothly.
The situation is the same with our heart. The heart is a muscle. It works like a pump and circulates the blood inside it throughout the body. But it does not use this blood itself. For its work to continue smoothly, it needs a constant supply of pure blood from the blood vessels connected to it. These blood vessels sit on it like a crown. That is why they are called coronary arteries.
As we age, these vessels get clogged. Fat, calcium, some proteins and some damaged cells form plaques and accumulate there. As a result, these vessels get clogged. They obstruct the blood flow through them. These plaques, known as plaques, are hard on the outside but soft on the inside. Sometimes this hard outer layer breaks and cracks. When this happens, cells called platelets, sensing an injury, rush to the area. Blood clots form there. They further block the blood vessels. When this happens, the blood supply to the part of the heart muscle to which the blood vessel is connected is cut off. It cannot do its pumping job properly. The cells there die due to lack of blood and oxygen. This is called a heart attack. Its medical name is myocardial infarction. Myo means muscle, cardiac means related to the heart, and infarction means death. Death of the heart muscle.
When such an attack occurs, the chest starts pounding. The chest pain spreads to the back, neck, or left shoulder. Breathing becomes difficult. Everyone starts sweating profusely. But some people, especially those with diabetes, have a stroke without experiencing any symptoms. This is called a silent heart attack.
When a heart attack occurs, there are significant changes in the amount of certain substances in the blood that keep it working properly. This is what is measured to diagnose a heart attack. Not only is complete rest necessary during a stroke, but medications like aspirin are also given to prevent blood clots. Medications that dissolve existing clots are also given.
हृदयविकाराच्या झटक्यामुळे काय होतं?
तेल वाहून नेणाऱ्या टँकर मध्ये हजार लिटर पेट्रोल किंवा डिझेल असते, पण त्या टँकरच्या इंजिनला त्याचा काहीच उपयोग नसतो. त्या टँकरच्या स्वतःच्या टाकितले तेल इंजिनला जोडलेल्या नळ्यांमधून त्याला योग्य रीतीने पुरवले गेले तरच ते इंजिन बिनबोभाट चालू राहते.
आपल्या हृदयाची परिस्थितीही तशीच असते. हृदय हा एक स्नायू आहे. पंपासारखे काम तो करतो आणि आपल्या आत असलेले रक्त शरीरभर खेळवतो. पण त्याला स्वतःला या रक्ताचा उपयोग होत नाही. त्याचे काम विनातक्रार चालू राहण्यासाठी त्याला जोडलेल्या रक्तवाहिन्यांमधून शुद्ध रक्ताचा पुरवठा त्याला सतत व्हावा लागतो. या रक्तवाहिन्या एखाद्या मुकुटासारखा त्याच्यावर विराजमान झालेल्या असतात. म्हणूनच त्यांना कॉरोनरी आर्टरी असे म्हटले जाते.
वय होत जाते तसतशा या वाहिन्या चोंदत जातात. चरबी, कॅल्शियम, काही प्रथिने आणि काही इजा झालेल्या पेशी यांच्या थप्प्या बनून त्या तिथे साचत राहतात. परिणामी या वाहिन्या चोंदतात. त्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाला अडथळा आणतात. प्लाक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या थप्प्या वरुन टणक पण आतून मऊसर असतात. काही वेळा हे वरचे टणक कवच फुटते, त्याला तडा जातो. तसे झाले की जखम झाली आहे असे वाटून प्लेटलेट्स नावाच्या पेशी तिथे धाऊन जातात. तिथल्या रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्या रक्तवाहिन्यांची अधिकच कोंडी करतात. तसे झाले की मग ती रक्तवाहिनी जोडलेल्या हृदयाच्या स्नायूच्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो. तो आपले पंपाचे काम व्यवस्थित करू शकत नाही. तिथल्या पेशी रक्ताच्या आणि ऑक्सिजनच्या अभावी मरून जातात. यालाच ह्रदयविकाराचा झटका असे म्हणतात. त्याचे वैद्यकीय नाव मायोकार्डियल इन्फार्क्शन असे आहे. मायो म्हणजे स्नायू, कार्डीयल म्हणजे हृदया संबंधित आणि इन्फार्क्शन म्हणजे मृत्यू. हृदयाच्या स्नायूचा मृत्यू.
What happens during a heart attack?
असा झटका येतो तेव्हा छातीत कळा मारू लागतात. छातीतली कळ पाठीकडे गळ्याकडे किंवा डाव्या खांद्यातून हातभर पसरते. श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ लागतो. सर्वांना दरदरून घाम सुटतो. परंतु काही जणांना खास करून मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना कोणतीही लक्षणं न जाणवता झटका येतो. त्याला सायलेंट हार्ट अटॅक असे म्हणतात.
हृदयविकाराचा झटका येतो त्या वेळी त्याचे काम सुरळीत चालू ठेवणाऱ्या रक्तातील काही विकारांच्या प्रमाणातही लक्षणीय बदल होतात. त्याचंच मोजमाप करून हृदयविकाराच्या झटक्याचे निदान केले जाते. झटका येतो त्या वेळी संपूर्ण विश्रांतीची आवश्यकता तर असतेच, पण रक्ताची गुठळी होऊ नये यासाठी अॅस्पिरिन सारखी औषधेही दिली जातात. तसेच असलेल्या गुठळ्या विरघळवणारे औषधंही दिली जातात.
What happens during a heart attack? What happens during a heart attack?What happens during a heart attack?What happens during a heart attack?What happens during a heart attack?